जयपूर : हिमाचल प्रदेशने (Himachal Pradesh) पहिल्यांदा विजय हजारे स्पर्धेंचं विजेतेपद (Vijay Hazare Trophy Final) पटकावलं आहे. हिमाचल प्रदेशने विजय हजारे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूवर वीजेडी नियमांनुसार 11 धावांनी विजय मिळवला आहे. तामिळनाडूने पहिले बॅटिंग करताना दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) शतकी खेळीच्या जोरावर 314 धावांपर्यंत मजल मारली. (Vijay Hazare Trophy 2021 Final HP vs TN Himachal Pradesh beat Tamil Nadu by 11 runs vjd method and win Maiden Title at Sawai Mansingh Stadium Jaipur)
या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना हिमाचलने 47.3 ओव्हरपर्यंत 299 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. त्यामुळे हिमाचलला विजयी घोषित करण्यात आलं. हिमाचलकडून विकेटकीपर बॅट्समन शुभम अरोडाने नाबाद 136 धावांची खेळी केली. तर अमित कुमारने 74 धावा केल्या.
तामिळनाडूची बॅटिंग
तामिळनाडूने पहिले बॅटिंग करताना 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 314 धावा केल्या. तामिळनाडूकडून अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकने 103 चेंडूत 8 चौकार आणि 7 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 116 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर बाबा इंद्रजितने 80 धावा केल्या. शाहरुख खाननेही 42 रन्सचं योगदान दिलं.
हिमाचलकडून पंकज जयस्वालने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कर्णधार रिषी धवनने 3 फलंदाजांना माघारी धाडलं.
हिमाचलची बॅटिंग
ओपनर विकेटकीपर बॅट्समन शुभम अरोरा हिमाचलच्या विजयाचा हिरो ठरला. शुभम अखेरपर्यंत मैदानात घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याने 131 चेंडूत 13 चौकार आणि 1 खणखणीत सिक्ससह नाबाद 136 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त अमित कुमारने 74 तर कर्णधार रिषी धवनने 42 धावा केल्या. दरम्यान शुभमने केलेल्या या शतकी खेळीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
#VijayHazareTrophy winners.
Congratulations and a round of applause for Himachal Pradesh on their triumph. #HPvTN #Final pic.twitter.com/bkixGf6CUc
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2021