पर्थ : T20 World Cup टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत - पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या हायव्होल्टेज सामन्यापुर्वी वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. त्यात आता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने टीम इंडियाच्या रणनीती आणि एका खेळाडूबाबत मोठं विधान केलं आहे. नेमकं हा माजी कर्णधार काय म्हणालाय, ते जाणून घेऊयात.
'या' खेळाडूची वाटते भीती
भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने (Misbah-ul-Haq) सूर्यकुमार यादवच्या (Surykumar Yadav) फलंदाजीवरही प्रतिक्रिया दिली आहे. मिसबाह म्हणाला की, सूर्यकुमार यादवमुळे मधल्या फळीत भारताची फलंदाजीची क्षमता वाढली आहे. त्याने ज्या प्रकारच्या शॉट्सची रेंज घेतली त्यामुळे गोलंदाजासमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत.
मिसबाह (Misbah-ul-Haq) पुढे म्हणाला की, सूर्यकुमार यादवच्या (Surykumar Yadav) चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीने आघाडीच्या फळीतील जबाबदारीत बदल झाला आहे. याशिवाय हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक देखील फिनिशरच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरने पाकिस्तानची झोप उडवण्यास सुरुवात केली आहे.
सूर्यकुमार यादवचा फॉर्म?
सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रमही नोंदवला आहे. या खेळाडूच्या धडाकेबाज फॉर्ममुळे आता पाकिस्तानची झोप उडाली आहे, कारण भारताला ट्रॉफी जिंकायची असेल तर सूर्यकुमार यादवला कोणत्याही परिस्थितीत आपली कामगिरी कायम ठेवावी लागेल, असे बोलले जात आहे.
इंग्लंडसारखी रणनीती आखतेय
मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) पुढे म्हणाला की, टीम इंडिया इंग्लंडसारखी रणनीती आखते आहे. टीम इंडिया आता हळूहळू इंग्लंडची रणनीती स्वीकारत आहे, जिथे पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे तो म्हणाला आहे.
दरम्यान टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे,मात्र टीम इंडिया 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या पहिला T20 सामना खेळणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना आहे.