पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज हायव्होल्टेज सामन्याचे टॉस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, तर पाकिस्तान प्रथम बॅटींग करणार आहे. आता प्रथम बॅटींग करून पाकिस्तान टीम इंडियासमोर किती धावांचे लक्ष्य ठेवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ind vs pak t20 world cup melbourne weather report team india won the toss chose feilding dinesh kartik rishabh pant)
कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी (Mohmmad shami) यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. या सर्वांत एक मोठा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे दिनेश कार्तिक (dinesh kartik) की ऋषभ पंत (rishabh pant) कोणाला संधी मिळाली आहे. हा प्रश्न वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आधीपासून अनुत्तरीत होता. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ पाहता अनुभवाला प्राधान्य देत दिनेश कार्तिकची प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लावली आहे, तर ऋषभ पंतला डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक मैदानात पाकिस्तान विरूद्ध लढताना दिसणार आहे.
दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवातून टीम इंडिया सावरू शकली नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडली. आता भारतीय संघाला पाकिस्तानकडून या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.