पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) टीम इंडिया (Team India) आज 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) भिडणार आहे. दोन्ही संघातला हा सामना काँटे की टक्कर असणार आहे. मात्र टीम इंडियाच्या विजयात पाकिस्तानचे हे 4 खेळाडू अडसर ठरू शकतात. हे खेळाडू सामन्यात जर चालले तर टीम इंडियाचं काही खर नाही. त्यामुळे हे खेळाडू कोण आहेत जाणून घ्या.
पाकिस्तानचे सर्वंच खेळाडू संध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. आशिया कपमध्ये या खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहुन सर्वच संघ शॉक झाले होते. त्यामुळे पाकिस्तानला हलक्यात घेण्याची कोणीही चुक करणार नाही. दरम्यान उद्या पाकिस्तान टीम इंडियाशी भिडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) , मोहम्मद रिझवान (mohmmad rizwan), बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) अ़डथळा ठरू शकतात.
शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकही टी-20 सामना खेळलेला नाही. भारताविरुद्धही तो गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये एकमेव टी20 सामना खेळला होता. या सामन्यात त्याने मॅच विनिंग स्पेल टाकला. आफ्रिदीने 31 धावांत 3 विकेट घेतले.
एकदिवसीय सामन्यांमध्येही तो 2019 विश्वचषकात भारताविरुद्ध एकमेव सामना खेळला होता. 2019 च्या विश्वचषकातील 6 सामन्यांमध्ये त्याने 7.04 च्या इकॉनॉमीने 7 विकेट्स घेतल्या होत्या. नुकताच तो इंजरीतून जात होता मात्र आता तो फिट झाला आहे आणि संघात पुनरागमन करत आहे. त्याचे पुनरागमन टीम इंडियाला भारी पडू शकते.
भारता विरुद्ध रिझवानची (mohmmad rizwan) बॅट खूप चालली आहे. आशिया कप आणि T20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या 3 सामन्यांत त्याने 193 धावा केल्या. त्याने 2 अर्धशतकही ठोकले आणि 79 ही सर्वोत्तम धावसंख्या केली. रिझवानने 130.40 च्या स्ट्राइक रेटने आणि 96.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या रिझवानची बॅट तळपली तर टीम इंडियाचं काही खऱ नाही.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो बराच काळ अव्वल क्रमांकाचा फलंदाज होता आणि सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गेल्या 2 वर्षात त्याने 48 सामने खेळले. त्याने 129.77 च्या स्ट्राईक रेटने आणि 37.87 च्या सरासरीने 1550 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही त्याने शतक झळकावले होते.
बाबर आझमने (Babar Azam) भारताविरुद्ध खेळलेल्या 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 92 धावा केल्या आहेत. T20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात, त्याने रिझवानसोबत 152 धावांच्या भागीदारीत 68 धावा केल्या. उर्वरित 2 टी-20 सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याने भारताविरुद्ध 5 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. मात्र 158 धावाच करू शकला आहे. बाबर आझमची देखील बॅट तळपली तर तो विजयात अडथळा ठरू शकतो.
मोहम्मद नवाजने (Mohammad Nawaz) 2016 मध्ये पाकिस्तानसाठी टी-20 पदार्पण केले. त्याला 2016 आणि 2021 च्या विश्वचषक संघातही स्थान देण्यात आले होते, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
आशिया कपमधील सुपर-4 सामन्यात त्याने भारताविरुद्ध 20 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. या खेळीमुळे पाकिस्तानने भारताकडून हा सामना जिंकला. याच स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने भारताविरुद्ध 33 धावांत 3 विकेट घेतले होते.
दरम्यान पाकिस्तानचे हे चार खेळाडू आहेत, जे टीम इंडियाच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. या चार खेळाडूंवर टीम इंडियाने अभ्यास केला, तर सहज विजय शक्य आहे.