मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) येत्या 23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (india vs pakistan) हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यावर पावसाचेही सावट असणार आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याने क्रिकेट फॅन्सची निराशा होणार आहे. दरम्यान जर टीम इंडिया आणि पाकिस्तान सामन्यात पाऊस पडलाच तर नेमकं काय समीकरण असणार आहे, जाणून घेऊयात.
हे ही वाचा : 'या' क्रिकेट टीमच्या बसला भीषण अपघात
ऑस्ट्रेलियाच्या (Austrailia) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, ऑस्ट्रेलियात 23 तारखेला मेलबर्नमध्ये 80 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच या सामन्यात पाऊस खोळंबा करणार इतकं मात्र नक्की. पावसामुळे सामन्याचे फारसे नुकसान होणार नाही अशी आशा आहे. एकवेळ ओव्हर्स घटवल्या तरी चालतील पण सामन्याचा निकाल लागणे आवश्यक आहे.
हे ही वाचा: क्वालिफायच गणित सुटलं! भारताच्या ग्रुपमध्ये 'या' दोन संघाची एन्ट्री
23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सामन्यात पाऊस पडू नये अशी प्रार्थना भारतीय क्रिकेट फॅन्स करतायत. भारताला टी20 वर्ल्ड कप (t20 world cup) 2021 च्या पराभवाचा आणि आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा बदला घ्यायचा आहे. अशा परिस्थितीत सामना झाला नाही तर करोडो चाहत्यांची निराशा होणार आहे.
हे ही वाचा : क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! वर्ल्ड कप विजयाचा प्रमुख दावेदार संघ स्पर्धेतून बाहेर
दरम्यान भारतासह पाकिस्तानी (india vs pakistan) क्रिकेट फॅन्स नक्कीच हा सामना पार पडेल अशी प्रार्थना करतायेत. कारण जर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर करोडो चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. या हायव्होल्टेज सामन्याची आता क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे.