तिने 6 महिन्यांची मुलगी विरोधी टीमकडे सोपवली कारण...

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की तो फक्त क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादीत राहात नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. पण...

Updated: Mar 7, 2022, 02:09 PM IST
तिने 6 महिन्यांची मुलगी विरोधी टीमकडे सोपवली कारण... title=

मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की तो फक्त क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादीत राहात नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. भारत विरुद्ध पाकिस्तान नुकत्याच झालेल्या सामन्यात एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. भारतीय महिला संघ मैदानातबाहेर पडल्यानंतर त्यांनी जे केलं त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो जेवढे भावुक करणारे आहेत तेवढेच एक वेगळी प्रेरणाही देणारे आहेत. 

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू आपल्या 6 महिन्यांच्या मुलीसोबत आली होती. सामना संपल्यानंतर तिने 6 महिन्यांच्या मुलीला आपल्या कडेवर घेतलं. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं होतं. भारतीय संघाच्या महिलांनी या चिमुकल्या परीला आपल्याकडे देण्यासाठी तिच्या आईला विनंती केली.

पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू बिस्माह मारूफने आपल्या 6 महिन्यांच्या चिमुकलीला भारतीय संघातील महिलांच्या हाती सोपवलं. त्यानंतर जे दृश्यं पाहायला मिळालं ते फार वेगळं आणि प्रसन्न करणारं होतं. भारतीय संघाच्या महिला या चिमुकलीसोबत खेळत आहेत. तिला आपल्या हातात घेऊन सेल्फी घेताना दिसत आहेत. 

पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूनं आपला विरोधी संघ असलेल्या भारतीय महिलांकडे तिने आपल्या मुलीला सोपवलं. त्यानंतर तिच्यासोबत प्रेमाचा सामनाच रंगला. संघातील महिला या चिमुकलीसोबत हसत खेळत होत्या. तिच्यासोबत फोटो, सेल्फी घेत होत्या. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ICC ने देखील याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

भारताच्या महिला संघाने 107 धावांनी पाकिस्तान संघावर विजय मिळवला. टी 20 वर्ल्डकपमध्ये पुरुष संघाला पाकिस्ताननं पराभूत केलं होतं. त्याचा बदला महिला संघाने घेतला. महिला भारतीय संघाचं जगभरात कौतुक होत आहे. भारताने 7 विकेट्स गमवून 244 धावा केल्या. आतापर्यंत पाकिस्तान संघाला 11 वेळा भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.