भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय

ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 14, 2023, 08:24 PM IST
भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय title=
India beat pakistan, Rohit Sharma great knock

ODI World Cup 2023 India vs Pakistan: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपचा (World Cup 2023) 12 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव (India Beat Pakistan) केला आहे. पाकिस्तानने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 7 गडी राखून सामना (India beat pakistan) जिंकला आहे. भारताकडून शार्दुल ठाकूर वगळता इतर पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या तर फलंदाजीमध्ये कॅप्टन रोहित शर्मा  (Rohit Sharma) चमकला. त्याने 63 बॉलमध्ये 86 धावांची धुंवाधार खेळी केली अन् टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.

पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने प्रेशर घेतलं नाही. पाकिस्तानच्या शाहिन शाह आणि हसन अलीला चोपण्यास सुरूवात केली. मात्र, मोठा शॉट मारण्याच्या नादात शुभमन गिल (Shubhman Gill) बॉल पॉईंटला उभ्या असलेल्या शाबादच्या हातात बॉल सोपवला. त्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानला कव्हर ड्राईव्हचे जलवे दाखवले. विराट देखील एका खराब बॉलवर कॅच आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने सावध सुरूवात करत रोहितला (Rohit Sharma) साथ दिली. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी काम फत्ते केलं.

भारत बनला टॉस चा बॉस 
 

सामन्यातील महत्त्वाचा असा टॉस भारताच्या पदरी पडला. पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. पाकिस्तानला मोहम्मद सिराजकडून पहिला हादरा बसला. अब्दुल्लाह शफिक सिराजच्या बॉलवर तंबूत परतला. इमाम उल हक याने दमदार फंलदाजीचे प्रदर्शन केलं. मात्र, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर इमाम बाद झाला. भारताला दुसरं यश मिळालं. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी जमली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली अन् पाकिस्तानचा जम बसवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा संघ 155 धावांवर असताना पाकिस्तानच्या 2 विकेट होत्या. मात्र, सिराजने बाबरची विकेट काढली अन् पाकिस्तानच्या हुकमी एक्का बाद झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजीनी प्रेशर आणलं. कुलदीप यादवचा मारा दुसऱ्या बाजूने चालू झाला. कुलदीपने शकील याला सहा धावांवर बाद केलं. पाकिस्तानला चौथा धक्का बसला. त्यानंतर कुलदीपने इफ्तिखार अहमदला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर पिच्चरमध्ये आला बुम बुम बुमराह...

बुमराहने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 ओव्हर केल्या होत्या. त्यानंतर रोहितने त्याला पुन्हा ओव्हर सोपवली. बुमराहने रिझवानला घरचा रस्ता दाखवला. मोहम्मद रिजवान 49 धावांवर बाद झाला. बुमराहच्या पुढच्या ओव्हरमध्ये शादाब खान अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानचा संघ आता रडकुंडीला आला होता. एकामागून एक विकेट्स गेल्यानंतर हसन अलीने पांड्याला फटकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जड्डूने फिरकी घेतली अन् हसन अलीला तुंबत पाठवलं. अखेर पाकिस्तानचा संघ 191 धावांवर गारद झालाय. त्यानंतर टीम इंडियाने 8-0 ने वर्ल्ड कपमध्ये बाजी मारली आहे.

आणखी वाचा - IND vs PAK : विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध केली मोठी चूक, LIVE सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये का परतला?

पाकिस्तानचा संघ : बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.

टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर