IND vs NZ: पाकिस्तानच्या रिझवानचा 'हा' रेकॉर्ड देखील तोडणार Suryakumar Yadav?

 भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादवने वर्ल्डकपप्रमाणेच त्याचा फॉर्म ठेवला तर स्वतःच्या नावे अजून एक रेकॉर्ड करू शकतो.

Updated: Nov 18, 2022, 04:42 PM IST
IND vs NZ: पाकिस्तानच्या रिझवानचा 'हा' रेकॉर्ड देखील तोडणार Suryakumar Yadav? title=

IND vs NZ: टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 world cup) आता टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळायची आहे. आज पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसाने व्यत्यत आणल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला. या सिरीजसाठी टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादवने वर्ल्डकपप्रमाणेच त्याचा फॉर्म ठेवला तर स्वतःच्या नावे अजून एक रेकॉर्ड करू शकतो.

मोहम्मद रिझवानला टाकणार मागे

टी-20 क्रिकेटमध्ये कॅलेंडर ऑफ इयरमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचा रेकॉर्ड सध्यातरी मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. रिझवानने 2021 मध्ये एकूण 29 सामने खेळले असून त्यामध्ये 26 डावांमध्ये 73.66 च्या सरासरीने 1326 रन्स बनवले आहेत.

तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने या वर्शी आतापर्यंत 29 सामने खेळले असून 29 डावांमध्ये 43.33 च्या सरासरीन 1040 रन्स करायचे आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडविरूद्धच्या उर्वरित 2 टी-20 सामन्यांमध्ये सूर्याला 286 रन्स करावे लागतील. ज्यामुळे तो कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिझवानला मागे टाकेल.

सूर्यकुमारने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) धमाकेदार कामगिरी करत पहिलं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे आयसीसीच्या क्रमवारीत त्याचं अव्वल स्थान कामय आहे. सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मधील 5 सामन्यात 3 अर्धशतकं ठोकली होती. 

सूर्याला वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे करियरमधील सर्वोत्तम 869 रेटिंग्स पॉइंट्स मिळाले होते. मात्र सूर्या इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये 10 धावांवर आऊट झाला होता. त्यामुळे सूर्याला 10 रेटिंग्स पॉइंट्सने नुकसान झालं. मात्र त्यानंतरही सूर्याने 859 पॉइंट्ससह सिंहासन कायम राखलंय.

टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरी

सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 189.68 च्या कडक स्ट्राईक रेटने 239 धावा कुटल्या होत्या. सूर्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.