IND vs NZ ODI : Kane Williamson ची कॅप्टन इनिंग, पहिल्या वनडेत भारताचा 7 विकेट्सने पराभव

न्यूझीलंडच्या टॉम लेथम आणि कर्णधर केन विलियम्सनच्या झुंजार खेळीपुढे भारताचा पराभव झालाय.

Updated: Nov 25, 2022, 03:16 PM IST
IND vs NZ ODI : Kane Williamson ची कॅप्टन इनिंग, पहिल्या वनडेत भारताचा 7 विकेट्सने पराभव title=

IND vs NZ 1st ODI : पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने (IND vs NZ) टीम इंडियाचा पराभव केलाय. न्यूझीलंडच्या टॉम लेथम (Tom Latham) आणि कर्णधर केन विलियम्सनच्या (Kane Williamson) झुंजार खेळीपुढे भारताचा पराभव झालाय. 7 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने वनडे सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडकडून टॉम लेथम या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्धणार केन विलियम्सनने टॉस जिंकला. यावेळी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 307 रन्सचं लक्ष्य टीमसमोर ठेवलं. यावेळी न्यूझीलंडची फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर टॉम लेथम आणि केन विलियम्सनच्या तुफान खेळीने भारताच्या वाटेचा विजय न्यूझीलंडने हिसकावला. यावेळी टॉमने नाबाद 145 तर केनने नाबाद 94 रन्सची खेळी केली.

भारताची इनिंग

शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवनने 21व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शुभमन गिलने 64 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 124 धावांची भागीदारी केली. गिलला लॉकी फर्ग्युसनने 50 धावांवर बाद केले. शिखर धवन 72 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत 33व्या षटकात 15 धावा काढून बाद झाला. त्यानंतर लगेचच त्याच षटकात सूर्यकुमार यादव देखील बाद झाला.

यानंतर मैदानावर जम बसवत श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन 46व्या षटकात 36 धावा काढून बाद झाला. शेवटच्या षटकात श्रेयस अय्यरला 76 चेंडूत 80 धावा करून टीम साऊदीने बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांच्यात 24 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाला. 

दरम्यान, या सामन्यात भारताचे युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.