India vs New Zealand : हॉकी वर्ल्ड कपमध्ये (Hockey World Cup 2023) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण न्यूझीलंडने पेनेल्टी शुटआऊटमध्ये टीम इंडियाचा 5-4 ने पराभव केला आहे. या पराभवाने टीम इंडिया हॉकी वर्ल्ड कपमधून (hockey world cup) बाहेर झाला आहे. यामुळे टीम इंडियाचे (Team India) हॉकी वर्ल्डचे स्वप्न भंगले आहे. यंदाच्या वर्षी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल अशी संपुर्ण देशवासियांना आशा होती. मात्र आशेवर आता पाणी फिरले आहे.
रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.
पहिल्या क्वार्टरमध्ये खुपच संथ खेळ झाला. दोन्ही संघाकडून आक्रमक खेळी झाली नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने गेर बदलला आणि आक्रमक हॉकी खेळली. आणि या क्वार्टरमध्ये भारताने दोन गोल केले. क्वार्टर सुरू होताच ललित उपाध्यायने पहिला गोल केला आणि सुमारे पाच मिनिटांत तीन पेनल्टी कॉर्नर वाया गेल्यानंतर चौथ्या पेनल्टी कॉर्नरवरून दुसरा गोल सुरजीतने केला होता. मात्र हाफ टाईमपूर्वी किवींनी पलटवार करत 2-1 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या 28व्या मिनिटाला सॅम लॅनने त्याला मिळालेल्या पासकडे फक्त हावभाव केला...उत्कृष्ट गोल करत न्यूझीलंडच्या खात्यात पहिला गोल नोंदवला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये चांगली हॉकी पाहायला मिळाली. कारण दोन्ही संघांनी 1-1 गोल केले होते. या क्वार्टरचा पहिला गोल भारतासाठी सुरजीतने पेनल्टी कॉर्नरवरून केला, पण न्यूझीलंडने पलटवार करत 3-2 अशी आघाडी घेतली. तर चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला आघाडी कायम राखता आली नाही. आणि सामन्याच्या 49व्या मिनिटाला न्यूझीलंडने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी 3-3 अशी बरोबरीत आणली.
दरम्यान सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला. आणि या पराभवानंतर टीम इंडियाचे (india vs new zealand) वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले आणि ती स्पर्धेतून बाहेर झाली.