Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा धमाका, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडीत काढलाय.  

Updated: Nov 22, 2022, 08:54 PM IST
Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा धमाका, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक  title=

वेलिंग्टन : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तिसरा टी 20 सामना पावसामुळे निकाली निघाला नाही. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. यासह या मालिकेत अनेक विक्रमही (Records) झाले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 'मॅन ऑफ द सीरिज' (Man Of The Series) ठरला. सूर्याने यासह मोठा रेकॉर्ड केलाय. सूर्याने विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडीत काढलाय. (ind vs nz 3rd t 20 team india suryakumar yadav break virat kohli record)

सूर्यकुमार एका वर्षात सर्वाधिक मॅन ऑफ द सीरिज पटकावणारा खेळाडू ठरला. सूर्या 2022 मध्ये 3 वेळा मॅन ऑफ द सीरिज होण्याचा बहुमान मिळवला. तर विराट कोहली 2016 साली 2 वेळा मालिकावीर ठरला होता.

दरम्यान टी 20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजमध्ये भिडणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका आहे. टीम इंडिया या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार आहे. या मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक. 

टीम न्यूझीलंड

केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर आणि टिम साउथी.