IND vs NZ 2nd T20: भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तर दुसरीकडे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेतील अंतिम सामन्यात द्विशतक झळकावून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर मात्र टीम इंडियाचा (team India) युवा सलामीवीर इशान किशन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. इशान किशन फ्लॉप ठरल्यानंतर त्याच्या जागी पृथ्वी शॉ ला संघात समावेश करण्याची मागणी होत आहे.
इशान किशन (Ishan Kishan) वनडे मालिकेत द्विशतक झळकावले असले तरी टी-20 सामन्यामध्ये त्याची बॅट शांत पाहायला मिळाली आहे. गेल्या 13 डावांत इशान किशनला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याची जागाही धोक्यात आली आहे. तसेच इशान किशने गेल्या 13 डावांमध्ये 19,4,1,2,37,10, 36,11,8,3,26,15 आणि 27 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत इशान किशनला टीम इंडियातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाचा: महात्मा गांधींचे 'हे' अनमोल विचार बदलतील तुमचं जीवन
किशनने गेल्या 4 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात केवळ 44 धावा केल्या आहेत. त्याचवेळी तीन वनडेत त्याच्या बॅटमधून फक्त 30 धावा झाल्या आहेत. त्याच्या फ्लॉप शोमुळे त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. इशान किशनला एकतर फॉर्ममध्ये परतावे लागेल अन्यथा त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला संघात स्थान मिळण्याचा धोका आहे. संजू सॅमसनची दुखापत आणि जितेश शर्माचा टी-20 संघातील अननुभवीपणामुळे इशान किशनची जागा कायम ठेवली जाऊ शकते. पण त्या द्विशतकानंतर तो पंतच्या जागी अपयशी ठरला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
4 धावा - भारत विरुद्ध न्यूझीलंड (पहिली टी-20)
17 धावा - भारत विरुद्ध न्यूझीलंड (तिसरा वनडे)
8 धावा नाबाद - भारत विरुद्ध न्यूझीलंड (दुसरा वनडे)
5 धावा - भारत विरुद्ध न्यूझीलंड (पहिला वनडे)
1 धाव - भारत विरुद्ध श्रीलंका (तिसरा टी-20)
2 धावा - भारत विरुद्ध श्रीलंका (दुसरी टी-20)
37 धावा - भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली टी-20)