IND vs NZ 2nd T20: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये दुसरा टी-20 सामना रविवारी खेळवला जाणार आहे. रांचीमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. किवींना भारताला 12 रन्सने मात दिली. अशातच 3 सामन्यांच्या या सिरीजमधील आजचा सामना भारतासाठी 'करो या मरो' अशा परिस्थितील आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होणार असून आजच्या या सामन्यात टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मोठे निर्णय घेऊन टीममध्ये बदल करू शकतो.
दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 (Ind vs Nz Playing 11) वर भारतीय चाहत्यांची नजर असणार आहे. हार्दिक पंड्या सिरीज वाचवण्यासाठी टीममध्ये कोणते बदल करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
लोअर मिडल ऑर्डर फलंदाज दीपक हुड्डा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत नाहीये. त्याच्या जागी विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा याला टीममध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जितेश शर्माने यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून चांगली खेळी केली होती. हिटर म्हणून पंजाब किंग्जच्या ताफ्यात त्याची ओळख आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंग भारतासाठी फारच महागडा ठरला होता. त्याने चार ओव्हर्समध्ये पन्नासहून अधिक रन्स दिले होते. मात्र असं असूनही हार्दिक पांड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात या युवा वेगवान गोलंदाजावर विश्वास ठेवू शकतो.
वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी रांची T20 मध्ये चांगली गोलंदाजी केली. दोघांनी एकूण तीन विकेट घेतल्या होत्या. यामुळे लेगस्पिनर युझवेंद्र चहलला पुन्हा एकदा इलेव्हनमधून बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात किवी टीमला हरवून टीम इंडियाला सिरीज वाचवायची आहे.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचे टॉप 3 बॅट्समन फेल गेले. शुभमन गिल (Shubhaman Gill) सोबत ओपनिंगला आलेला इशान किशनने केवळ चार धावा केल्या. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्येही इशानने अपेक्षित कामगिरी केली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने फक्त 40 धावा केल्या. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात स्टार सलामीवीर पृथ्वी शॉला संधी देऊ शकतो.
शुभमन गिल, पृथ्वी शॉ/ईशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, शिवम मावी, अर्शदीप सिंह.
डेवोन कॉन्वे (विकेटकीपर), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिचेल, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर (कर्णधार), ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर, जॅकब डफी.