Ind Vs Eng: उत्तम कॅच घेण्याच्या नादात हरमनप्रीतल दुखापत, टीम इंडियाचं वाढलं टेन्शन

महिला क्रिकेट संघ वर्ल्ड कपचे सामने खेळत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवासोबतच टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटूला दुखापत झाली आहे. 

Updated: Mar 16, 2022, 05:06 PM IST
Ind Vs Eng: उत्तम कॅच घेण्याच्या नादात हरमनप्रीतल दुखापत, टीम इंडियाचं वाढलं टेन्शन title=

मुंबई : महिला क्रिकेट संघ वर्ल्ड कपचे सामने खेळत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवासोबतच टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटूला दुखापत झाली आहे. 

या सामन्यात संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने दर्जेदार कॅच घेतला. मात्र त्याचसोबत तिला कॅच घेताना दुखापतही झाली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. 

इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना 25 व्या ओव्हर दरम्यान राजेश्वरी गायकवाड बॉलिंग करत होती. तिने टाकलेला बॉल कॅच करण्यासाठी हरमनप्रीत कौर उंच हवेत उडी मारून कॅच घेत होती. मात्र याच दरम्यान तिच्या मानेला आणि पाठीला कॅच पकडताना त्रास झाला. तिच्या कॅचचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 

त्यानंतर काही वेळानं फिल्डिंग करताना तिचा पाय घसरला. मैदानात डॉक्टर आले त्यांनी तिला तपासलं. तिला झालेल्या दुखापतीमुळे तिला सामन्यादरम्यानच मैदान सोडण्याची वेळ आली. 

महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध 134 धावा केल्या. स्मृती मंधानाने 35 धावा केल्या तर ऋचा घोषने 33 धावा केल्या आहेत. महिला टीमच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता हरमनप्रीत कौर मैदानात कधी परतणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिला झालेल्या दुखापतीमुळे महिला टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x