'क्रिकेटपटू IPL नाही तर....' पाकिस्तानचे Ramiz Raja पुन्हा बरळले

IPL वर पाकिस्तानचे  Ramiz Raja जे बरळले तर ऐकून तुम्हालाही हसू  आवरणार नाही, पाहा नेमकं असं काय घडलंय

Updated: Mar 16, 2022, 03:52 PM IST
'क्रिकेटपटू IPL नाही तर....' पाकिस्तानचे  Ramiz Raja पुन्हा बरळले title=

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाते. या लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होतात. या लीगसंदर्भात आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन Ramiz Raja यांनी अजब वक्तव्य केलं. मात्र ह्या वक्तव्याला अनेकांनी मनावर घेण्याऐवजी लोकांना हसू आवरेनासं झालं. 

भारताच्या शेजारचा देश म्हणजे पाकिस्तान. भारताप्रमाणेच पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन करतो. या लीगमध्ये देखील अनेक जगभरातील खेळाडू सहभागी होतात.  आता या लीग आणि आयपीएलवरून रमीज राजा यांनी अजब विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. 

पाकिस्तानची पीएसएल आणि ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग ही जगात सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट करणारी लीग मानली जाते. आणखी जास्त पैसा वाढवण्यासाठी आता काही बदल करणार असल्याचे रमीज राजा यांनी संकेत दिले आहेत. पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात PSL आयपीएलला टक्कर देईल असा दावा त्यांनी केला आहे. 

PSL कडे आयसीसीने दिलेल्या फंडशिवाय आणखी कोणताही सध्या मार्ग नाही. पण ते मॉडेलवर चर्चा करत आहेत. फ्रान्चायझीच्या मालकांशी त्यांची चर्चा सुरू आहे. जेव्हा पाकिस्तानचं आर्थिक गणित वाढेल तेव्हा सहाजिकच मान वाढेल आणि त्याचा फायदा होईल. तेव्हाच आयपीएलशी स्पर्धा करणं अधिक सोपं होईल. त्यावेळी पाहू की आयपीएल खेळायला जातात की पाकिस्तान सुपर लीगमध्ये येतात. 

माझा विश्वास आहे अनेक खेळाडू तेव्हा आयपीएल नाही तर पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी येतील असा दावा रमीज राजा यांनी केला आहे. जगात सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. BCCI ला या लीगमधून हजारो कोटी रुपयांचा दरवर्षी फायदा होतो.