IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीमध्ये टीम इंडिया आता विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचली आहे. तिसऱ्या कसोटीच्या (Rajkot test) दुसऱ्या डावात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने धमाकेदार खेळी करत डबल सेंच्युरी ठोकली. तब्बल दोन दिवस मैदान गाजवणाऱ्या यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. तर बेन स्टोक्सचा चेहरा देखील पडल्याचं दिसून आलं. चौथ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर यशस्वी (Yashasvi Jaiswal) आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) यांनी बेझबॉल गेम सुरू केला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं. मात्र, यशस्वी द्विशतकापैक्षा सरफराजने असं काही केलं, ज्याचं सध्या कौतूक होताना दिसतंय.
यशस्वी जयस्वाल 192 धावांवर पोहोचलेला असताना सरफराज 40 धावांवर होता. त्यावेळी यशस्वीवर दबाव येऊ नये म्हणून सरफराजने सुत्र हातात घेतली अन् आक्रमक खेळ दाखवला. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज प्रेशरमध्ये आले. यशस्वीने तोपर्यंत हळूहळू 199 वर पोहोचला. दुसरीकडे सरफराजने 50 पूर्ण केली अन् जंगी सेलिब्रेशन केलं. आता यशस्वीच्या द्विशतकाची प्रतिक्षा होती. 96 व्या ओव्हरमध्ये यशस्वीने बॉल दोन खेळाडूंच्या मध्ये प्लेस केला अन् धाव घेतली.
यशस्वीने धाव घेताच सरफराजने दोन्ही हात वर केले आणि यशस्वीच्या शतकाचं स्वागत केलं. एका खेळाडूच्या आनंदात दुसरा खेळाडू आनंदी झाल्याचं चित्र खूप कमी वेळा पहायला मिळतं. सरफराजने मात्र, पहिल्याच कसोटी सामन्यात सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. यशस्वीच्या द्विशतकाआधी काही ओव्हरपूर्वी दोन्ही खेळाडूंमध्ये रन घेण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी सरफराजचा पारा चढल्याचं देखील पहायला मिळालं होतं.
पाहा Video
Celebration of #SarfarazKhan says it all
No hindu, no muslim pure love for their partners
This is what sports mean#YashasviJaiswal #INDvENG pic.twitter.com/oynw0VDHVJ— Sherlock Ohms (@Wanmohnev) February 18, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) द्विशतकीय खेळीमुळे टीम इंडियाने इंग्लंडसमोर 557 धावांचं लक्ष ठेवलंय. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने 214 धावांची खेळी केली तर शुभमन गिलने 91 धावांची संयमी इनिंग खेळली. तर मैदानावर यशस्वी जयस्वालला मोलाची साथ देणाऱ्या सरफराज खानने नाबाद 68 धावा कुटल्या.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.