Ind vs Eng: टीम इंडियातील प्रसिद्ध कृष्णाबद्दल काय म्हणाला शोएब अख्तर

पाकिस्तानचा पूर्व गोलंदाज शोएब अख्तर टीम इंडियातील खेळाडूचा फॅन झाला

Updated: Mar 26, 2021, 02:30 PM IST
Ind vs Eng: टीम इंडियातील प्रसिद्ध कृष्णाबद्दल काय म्हणाला शोएब अख्तर title=

मुंबई: पाकिस्तानचा पूर्व गोलंदाज शोएब अख्तर टीम इंडियातील खेळाडूचा फॅन झाला आहे. त्याने टीम इंडियातील खेळाडू प्रसिद्ध कृष्णाबाबत वक्तव्य करताना त्याचा फॅन झाल्याचंही सांगितलं. शोएब आणि कृष्णा त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रसिद्ध भारतीय वेगवान गोलंदाज कृष्णाचं कौतुक केलं. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने शानदार पदार्पण केलं. प्रसिद्ध कृष्णाने 8.1 ओव्हरमध्ये 54 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या.

प्रसिद्ध कृष्णाबाबत काय म्हणाला शोएब? 
कृष्णा नाही तर हा करिष्मा असल्याचं शोएब म्हणाला आहे. प्रसिद्ध कृष्णानं केलेलं डेब्यु कमाल आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या. ही गोष्ट चमत्कारापेक्षा कमी नाही. 

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन डे सामन्यातही प्रसिद्ध कृष्णा खेळत आहे. त्याच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यात कामगिरी चांगली केल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.