चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड आज चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. चेन्नईमध्ये हा सामना सुरू आहे. भारतीय संघासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं पहिला फलंदाजिचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात अगदी सावधपणे झाली. त्यानंतर दोन गडी बाद झाले. मग इंग्लंडच्या संघानं सामन्यात वेग धरला.
इंग्लंड संघाच्या फटकेबाजीपुढे भारतीय गोलंदाज बेहाल व्हायचे बाकी होते. मात्र भारतीय संघानं प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व सामन्याच्या सुरूवातीलाच दिसून आले.
दुपारच्या जेवणानंतर इंग्लंडच्या जो रूट आणि सिबलीने जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला मजबूती दिली. चेन्नईच्या मैदानात जो रूटने भारतीय गोलंदाजांना बेहालच केलं. प्रत्येक चेंडूवर तुफान फलंदाजी करत त्याने 164 चेडूंमध्ये शतक ठोकलं. रूटच्या कसोटी सामन्याच्या कारकीर्दीमधील हे 20वं शतक आहे.
Three hundreds in three consecutive Tests for Joe Root, in 2021:
228 v Sri Lanka
186 v Sri Lanka
100 v India (today) pic.twitter.com/pVEy0s8qSD— ICC (@ICC) February 5, 2021
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट त्याच्या कारकीर्दीमधला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. या 100 व्या कसोटी सामन्यात त्यानं शतक पूर्ण केलं आहे. 100 कसोटी सामने खेळणारा तिसरा युवा खेळाडू आहे. रूट हा 15 वा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे ज्याने 100 कसोटी सामने पूर्ण केल्या आहेत. रूटने चेन्नई कसोटीपूर्वी 99 सामन्यांत 8249 धावा केल्या आहेत. यात 19 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांमध्ये जर जो संघ जिंकेल तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यासाठी पोहोचेल. हा अंतिम सामना न्यूझिलंड होणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी कोण पोहोचणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.