IND vs BAN : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेशच्या (India vs Bangladesh) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. यातील वनडे मालिकेला उद्या रविवारी 4 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा दौरा ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) महत्वाचा असणार आहे. कारण या दौऱ्यात तो फ्लॉप ठरल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
ऋषभ पंतला (Rishabh Pant) T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये संधी मिळाली होती. झिम्बाब्वे आणि इंग्लंडविरुद्ध तो सामने खेळला होता. मात्र त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही तो फ्लॉप ठरला होता. या दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या चार डावांचा समावेश करून त्याला एकूण 42 धावा करता आल्या होत्या.
ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली, तर त्याच्या बॅटमधून फक्त 96 धावा आल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे. या नऊ डावांमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन अनधिकृत टी-20 सामनेही समाविष्ट आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंत या नऊ डावांतून एकदाही 27 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.
ऋषभ पंतला (Rishabh Pant) इतक्या संधी देऊन सुद्धा तो फ्लॉप ठरलाय. त्यामुळे सिलेक्शन टीमवर त्याला सतत संधी देण्यावर टीका होतेय. त्यात संजू सॅमसन, इशान किशन या यष्टीरक्षक फलंदाजांना फारशी संधी मिळत नाहीये. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच संतापले आहे. याचा दबाव ऋषभ पंतवर (Rishabh Pant) पडताना दिसत आहे.
दरम्यान बांगलादेशविरूद्धची सीरीज ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) शेवटची असणार आहे. या सामन्यात जर तो चांगली कामगिरी करू शकला नाही, तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. त्याच्या जागी मग दुसऱ्या खेळाडूला संघात संधी मिळणार आहे.
वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल
टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव