IND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप

IND vs BAN 3rd ODI : टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी असल्याचेही बोलले जात आहे.

Updated: Dec 9, 2022, 02:40 PM IST
 IND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप  title=

IND vs BAN 3rd ODI : टी20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील धक्कादायक पराभवानंतर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशविरूद्धची वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे सततच्या या अपयशी कामगिरीनंतर टीम इंडिया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तसेच दिग्गज खेळाडूंकडून देखील टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यात आता एका माजी खेळाडूने टीम इंडियावर खुप गंभीर शब्दात टिका केली आहे. या टीकेची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे.

टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे टीम इंडियावर सध्या चहू बाजूंनी टीका होतेय. त्यात आता 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेले माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल (madan lal) यांनी टीम इंडियावर गंभीर टीका करत चिंता व्यक्त केली आहे.

गंभीर आरोप काय? 

मदन लाल (madan lal)  एका मुलाखतीत म्हणाले की, टीम इंडियाची वाटचाल योग्य दिशेने होत नाही आणि त्यांच्यात उत्साह दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मदन लाल यांनी सांगितले की, निश्चितपणे हा भारतीय संघ योग्य दिशेने जात नाही. गेल्या काही काळात मी संघात तो उत्साह पाहिला नाही. गेल्या दोन वर्षांत मला त्याच्यात उत्साह दिसला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर खेळाडू देशाप्रती खेळत असल्याचे अजिबात दिसून येत नाही, अशी गंभीर टीका देखील त्यांनी केली. 

मदन लाल पुढे म्हणाले की, टीम इंडिया (Team India) देशाप्रती खेळत असल्याचे अजिबात दिसत नाही. देशासाठी खेळण्याची जिद्द कमी होती. एकतर ते खूप थकले आहेत किंवा ते फक्त प्रवाहासोबत चालले आहेत. ही फार चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

दरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यातील पराभवानंतर स्वत: कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) नाराजी व्यक्त केली होती. यावर मदनलाल म्हणाले की, जर कर्णधार असे म्हणत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकत आहे. याला जबाबदार कोण? याला प्रशिक्षक जबाबदार आहेत का? अनफिट खेळाडू का सोडत आहेत? तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहात आणि निकाल तुमच्या समोर आहे, असे देखील सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. 

मदनलाल (madan lal) यांच्या या टीकेची आता क्रिकेट वर्तुळात खुप चर्चा रंगली आहे.