IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!

Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. 

Updated: Dec 12, 2022, 03:56 PM IST
IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!    title=

IND vs BAN, 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (team India) स्टार खेळाडू बांगलादेशी संघाला धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू इतका धडाकेबाज आहे की, तो एकहाती संपूर्ण बांगलादेशी संघाला अद्दल घडवू शकतो. तसेच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित झाले असून चटगाव येथे पार पडणार आहे. टीम इंडियाचा हा खेळाडू सर्वोत्तम फलंदाज, घातक गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक यांचे संपूर्ण पॅकेज आहे.

टीम इंडियाचा हा खेळाडू  'ऑलराऊंडर' 

हा खेळाडू वेगवान फलंदाजी करतो आणि गोलंदाज म्हणून प्रतिस्पर्ध्यांसाठी सर्वात मोठा मारक ठरतो. क्षेत्ररक्षण करतानाही या खेळाडूच्या धावपळीसमोर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज धावा चोरण्याचा धोकाही पत्करत नाहीत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हा खेळाडू अष्टपैलू रवींद्र जडेजाची अनुपस्थिती पूर्ण करेल, त्याचे नाव अक्षर पटेल आहे.

प्लेइंग 11 मध्ये स्थान जवळजवळ निश्चित झाले!

अक्षर पटेल हा एक थ्रीडी खेळाडू आहे. जो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात अत्यंत कुशल आहे. बांगलादेश संघाला पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागणार आहे. अक्षर पटेलची बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होणे जवळपास निश्चित झाले आहे. रवींद्र जडेजा बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.'

वाचा: PNB खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! हा अलर्ट पाहा...नाहीतर होईल मोठे नुकसान  

अशा स्थितीत अक्षर पटेल हा दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विनसोबत खेळण्याचा प्रबळ दावेदार आहे. अक्षर पटेलने 6 कसोटी सामन्यात 39 बळी घेतले असून 197 धावाही केल्या आहेत. अक्षर पटेलने कसोटी सामन्यात 5 वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय अक्षर पटेलने एकदा एका सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.