Rishabh Pant Record : बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) ऋषभ पंतने (Rishabh Pant) मोठा रेकॉर्ड केला आहे. असा रेकॉर्ड करत त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) पक्तीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे बांगलादेशविरूद्ध त्याला निव्वळ 46 धावा करता आल्या, तरीही त्याने रेकॉर्ड कसा रचला, असा प्रश्न फॅन्सना पडलाय. हे जाणून घेऊयात.
भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला. त्याला अर्धशतक देखील ठोकता आले नाही. मात्र तरीही त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला (Rishabh Pant record) 45 बॉलमध्ये 46 धावाच ठोकता आल्या आणि तो बाद झाला. मात्र, याआधी त्याने भारताचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून विशेष कामगिरी केली. या सामन्यात ऋषभ पंतने 25 धावा केल्याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला. आता महेंद्रसिंग धोनीनंतर ऋषभ पंत हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
ऋषभ पंतने (Rishabh Pant record) टेस्टमध्ये 4000 धावा करण्यासोबत 50 सिक्स मारण्याचाही विक्रम केला आहे. त्याने टेस्टमध्ये 50 सिक्स ठोकले आहेत.
ऋषभ पंतने (Rishabh Pant record) भारतासाठी आतापर्यंत एकूण 32 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 43.38 च्या सरासरीने 2169 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 10 अर्धशतके आहेत. ऋषभने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 865 धावा केल्या आहेत, तर 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 987 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4021 धावा केल्या आहेत.
दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant record) 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. जेव्हा टीम इंडियाने तीन मोठे विकेट लवकर गमावले होते. तेव्हा त्याने डाव सांभाळताना चेतेश्वर पुजारासोबत 64 धावांची भागीदारी केली. पण, मेहदी हसनच्या चेंडूवर तो बोल्ड झाला. पंतने या डावात 46 धावा केल्या आहेत. सध्या टीम इंडियाने 4 विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. आता टीम इंडिया (Team India) पहिल्या डावात किती धावा पुर्ण करते हे पाहावे लागेल.