Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...

IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.

Updated: Dec 14, 2022, 01:52 PM IST
Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच... title=

Rishabh Pant IND vs BAN 1st Test : वनडेनंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) आमनेसामने आले आहेत. एकदिवसीय मालिकेत 1-2 ने गमावल्यानंतर टीम इंडियाला कसोटीत धमाकेदार सुरुवात करायची आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (rohit sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाची धुरा सांभाळणार आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना खेळला. त्यात टीम इंडियाचा (team India) पराभव झाला. अशा परिस्थितीत राहुल त्याच्या नेतृत्वाखाली पहिला विजय मिळवेल. याच दरम्यान टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे (Paras Mhambre) यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल (Rishabh Pant) मोठे वक्तव्य केले.    

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे म्हणाले की, संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला त्याच्या नैसर्गिक आक्रमणाचा खेळ बदलण्याचा सल्ला देणार नाही. त्याला त्याची भूमिका आणि त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांची जाणीव आहे. पंतने 31 सामन्यांमध्ये 5 कसोटी शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांविरुद्ध शतके झळकावली आहेत. पहिल्या कसोटीपूर्वी पंत नेटवर आक्रमक फलंदाजी करताना दिसला.

वाचा: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' खेळाडू अजूनही भारतातच! 

पारस म्हांब्रे यांना पंतच्या वृत्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'आम्ही ऋषभशी कोणतीही विशेष चर्चा केलेली नाही. ही त्याची खेळण्याची पद्धत आहे आणि आम्हाला ते माहित आहे. काहीही बदलले नाही. तो कसा खेळतो याबद्दल आम्ही कधीच बोलत नाही कारण संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे त्याला ठाऊक आहे.

भारत आणि बांगलादेश संघातील पहिला सामना झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर चट्टोग्राम येथे सकाळी साडेनऊला सुरु झाला. आतापर्यंत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 11 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 9 विजय मिळवले असून 2 सामने अनिर्णित राहिले. 2015 नंतर भारतीय संघ बांगलादेशच्या भूमीवर कसोटी खेळणार आहे. भारताने बांगलादेशमध्ये शेवटचा विजय 2010 मध्ये नोंदवला होता.