IND VS BAN 1st Test Match : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात यांच्यात गुरुवार 19 सप्टेंबर पासून टेस्ट सीरिजमधला पहिला सामना खेळवला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना सुरु असून या सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाच्या तीन स्टार फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले. हसनने यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध सुद्धा अशीच गोलंदाजी करून त्यांना घाम फोडला होता.
चेपॉक स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला टेस्ट सामना पार पडत आहे. या सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. टीम इंडियाकडून सलामी फलंदाजीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी उतरली. मात्र 6 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने त्याला आउट केले. 19 बॉलकर रोहित फक्त 6 धावा करून बाद झाला. रोहित पाठोपाठ हसनने शुभमन गिलला सुद्धा बाद केले. गिलला एकही धाव करता आली नाही.
हेही वाचा : 'त्यांना मजा घेऊ देत, बघून घेऊ...' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला दिला इशारा
शुभमननंतर विराट कोहली मैदानात आला. विराट आणि यशस्वी मैदानात टिकून राहतील अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र तसं झालं नाही. हसनने लगेचच 10 व्या ओव्हरला विराट कोहलीला सुद्धा बाद केले. विराट कोहली केवळ 6 धावाचं करू शकला. गिल आणि विराट हसनच्या बॉलवर शॉट खेळताना बाद झाले. दोघांचेही कॅच लिटन दास यांनी पकडले. तर रोहित शर्मा हा स्लिपमध्ये आउट झाला.
हसन महमूद 24 वर्षीय बांगलादेशी क्रिकेटपटू असून तो गोलंदाज आहे. हसन महमूदने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त तीन सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 14 विकेट्स घेतले. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 22 सामने खेळताना 30 विकेट्स घेतल्या आहेत. तो T20 मध्ये 18 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 18 विकेट घेतल्या आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा