Babar Azam Post On Prophet Muhammad: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमचा सध्या क्रिकेटमधील बॅड पॅच सुरु आहे. बाबरला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करण्यात सातत्याने अपयश येत आहे. मैदानावरील कामगिरीमध्ये सातत्य नसल्याने बाबर टीकेचा धनी ठरत असताना आता त्याने थेट देवाचा धावा केल्याचं पाहायला मिळत आहे. 'ईद ए मिलाद उन नबी'च्या पार्श्वभूमीवर बाबरने केलेली एक पोस्ट सध्या सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.
बाबर आझमने आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक धार्मिक संदर्भ देत पोस्ट केली आहे. बाबरने प्रेषिक मोहम्मद पैगंबरांचा एक विचार शेअर केला आहे. "सर्वाधिक अंधारलेल्या काळात प्रेषित मोहम्मद हेच प्रकाशाच्या ज्योतीप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यांनीच आपल्याला करुणेच्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्यास शिकवलं," असं बाबरने म्हटलं आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाला सध्या अंतरराष्ट्रीय स्तरावर बाबरच्या नेतृत्वाखाली सातत्याने अपयशाचं तोंड पहावं लागत असल्याने त्याच्या या पोस्टकडे या संदर्भातूनही पाहिलं जात आहे.
संघाबरोबरच बाबरला स्वत:ला वैयक्तिक स्तरावर कामगिरी उंचावण्यात आणि संघासाठी योगदान देण्यात अपयश येत असल्याने त्याने या पोस्टमध्ये ज्या अंधाराचा उल्लेख केलाय तो सध्या पाकिस्तानच्या कामगिरीशी जोडून पाहिला जात आहे.
नक्की पाहा >> Video: 'पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव' पाहिलात का? बॉण्ड्रीजवळ हवेत झेप घेत...
Prophet Muhammad, the light in the darkest hour, who taught us to see through the eyes of compassion. #FidakaAbiWaUmi
— Babar Azam (@babarazam258) September 17, 2024
मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेपासून बाबर आझमला नावाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने नुकत्याच खेळलेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये बाबरला चार डावांमध्ये 0, 22, 11 आणि 31 दावा करता आलेल्या. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा मालिका गमावल्यानंतर बाबर आयसीसीच्या अव्वल दहा फलंदाजांच्या यादीमधून अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाहेर फेकला गेला. तेव्हापासून बाबरच्या नेतृत्वावर कठोर टीका केली जात आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2024 मधून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतरही बाबरवर टीका झाली. या स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताबरोबरच पाकिस्तानचा चक्क पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेकडूनही पराभव झाल्याने सर्वांनाच आस्चर्याचा धक्का बसला. त्यामुळेच बाबरच्या नेतृत्वावर टीका अधिक तिक्ष्ण झाली. पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानने बाबरला विराट कोहलीचा आदर्श घेऊन कर्णधारपद सोडण्याचाही सल्ला दिला.