IND vs BAN : 7 वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जे धोनीला जमलं नाही, ते रोहित करुन दाखवलं का?

IND vs BAN Latest Update :  7 वर्षांनंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेला आहे. जे त्यावेळी धोनीला जमलं नव्हतं ते रोहित शर्मा करुन दाखवलं का, अशी अपेक्षा क्रिकेटमध्ये आहे.   

Updated: Dec 4, 2022, 09:26 AM IST
IND vs BAN : 7 वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जे धोनीला जमलं नाही, ते रोहित करुन दाखवलं का? title=
IND vs BAN 1st ODI Team India ready to avenge 7 years ago and Did Rohit show what Dhoni could not do nmp

IND vs BAN 1st ODI : तब्बल  7 वर्षांनंतर टीम इंडिया (Team India) बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यावर गेला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्त्वात टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेली होती. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया बांगलादेशशी दोन हात करणार आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) विश्रांती घेतली होती. त्यामुळे या दौऱ्यात रोहित शर्मा धोनीचा बदला घेणार का अशी चर्चा रंगली आहे. 

7 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

महेंद्र सिंग यांच्या नेतृत्त्वात 2015 मध्ये टीम इंडिया बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यासाठी गेली होती. तीन सामन्यांमध्ये बांगलादेश 2 सामने जिंकले आणि त्यामुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली. त्यामुळे आता तब्बल 7 वर्षांनी रोहित शर्माची टीम हा बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे. (IND vs BAN 1st ODI Team India ready to avenge 7 years ago and Did Rohit show what Dhoni could not do)

आकडेवारी कुणाच्या बाजूने? (Had To Head)

उभयसंघात आतापर्यंत 36 वनडे खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 30 सामन्यात विजय मिळवलाय. तर बांगलादेश फक्त 5 सामन्यात यशस्वी ठरलीय. तर एक सामना हा अनिर्णित राहिला. त्यामुळे या आकडेवारीनुसार टीम इंडिया वरचढ ठरली आहे. 

एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश

लिट्टन दास (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ होसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद (दुखापतग्रस्त), हसन महमूद, इबादत होसैन, नसुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल होसैन शंटो, काजी, नूरुल हसन सोहन आणि शोरीफुल हसन (राखीव)

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.