IND vs AUS : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया फॉर्ममध्ये! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात लोळवलं

IND vs AUS 1st ODI : मोहालीच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 25, 2023, 03:27 PM IST
IND vs AUS : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया फॉर्ममध्ये! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात लोळवलं title=

IND vs AUS 1st ODI : मोहालीच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. वर्ल्डकपपूर्वी ही सिरीज अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. या सामन्यामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट

आजच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कांगारू फलंदाजीसाठी मैदानात उतरले असताना मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढली. टॉप ऑर्डरमध्ये मिचेलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. यावेळी  डेव्हिड वॉर्न याने 53 बॉलमध्ये 52 रन्सची खेळी केली. स्टीव्हन स्मिथ 60 बॉलमध्ये 41 रन्स केले. 

यानंतर मार्नस लबुशेन याने 39 रन्स केले. तर कॅमरुन ग्रीनने 31 रन्स जोडले. जोस इंग्लिसला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र त्याआधीच बुमराहने त्याला पव्हेलियनमध्ये परत पाठवलं. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू 276 रन्समघ्ये ऑल आऊट झाले. 

मोहम्मद शमीने घेतल्या 5 विकेट्स 

आपल्या भेदक कामगिरीच्या जोरावर मोहम्मद शमीने आज कांगारूंची कंबर मोडून काढली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 5 कांगारू फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलंय. या पाच विकेट्सच्या मदतीने शमी भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात 93 वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनलाय.