Mohammed Shami, IND vs AUS : आयुष्यात एकदा तरी टीम इंडियासाठी खेळायचं, असं स्वप्न प्रत्येक क्रिकेटर पाहत असतो. मेहनतीच्या जोरावर एखादा खेळाडू मोठा झाला तरी त्याला संघात कायम राहण्यासाठी त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. खेळात सातत्य आणि मेहनत याशिवाय दुसरा पर्यायच नाही. अनेक खेळाडू आले अन् गेले, संघात टिकून राहिला त्याचं नाव होतं. अशातच आता या यादीत मोहम्मद शमीचं नाव जोडलं गेलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोहम्मद शमीने आज मनमोकळेपणे गोलंदाजी केली अन् कांगारूंचा पंचनामा केला.
आपल्या भेदक कामगिरीच्या जोरावर मोहम्मद शमीने आज कांगारूंची कंबर मोडून काढली. मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोनिस यासारख्या खेळाडूंची विकेट शमीने मोडून काढली. शमीच्या गोलंदाजीमध्ये आज मोकळेपणा दिसत होता. अचूक लाईन अन् लेन्थ पकडून शमीने गोलंदाजी केली. त्याचबरोबर शमी आज सिलेक्टर्सच्या विश्वासावर खरा उतरला आहे. त्यामुळे आता शमी वर्ल्ड कपमध्ये जरी बेंचवर असला तरी तो टीम इंडियासाठी मजबूत बॅकअप खेळाडू असेल, हे त्याने सिद्ध केलंय.
That has been one special effort with the ball!
A second ODI FIFER for @MdShami11 ! #TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qXbQCAIZxQ
— BCCI (@BCCI) September 22, 2023
गेल्या महिनाभरापासून शमी अडचणीत होता. पत्नी हसीन जहांने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणासंदर्भात शमीली कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, शमी वर्ल्ड कप संघात असल्याने कोलकाताच्या अलीपूर कोर्टाने 2000 रूपयांच्या जातमुचलक्यावर शमीचा जामीन मंजूर केला होता. त्यामुळे शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. शमीला जामीन मिळताच पत्नीने एक पोस्ट करत शमीविरुद्ध दंड थोपटले. इतका मोठा खेळाडू असून त्याचा काही उपयोग झाला नाही, त्याचा 'माज' उतरवला, असं हसीन जहां म्हणाली होती. त्यानंतर आता शमीने मैदानात कामगिरी करत जोरदार उत्तर दिलंय. अप्रतिम बॉलिंगनंतर शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या...
मी खूप आनंदी आहे. मला गोलंदाजी करताना सिराजचा सहवास खूप चांगला वाटला. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणं आणि टोन सेट करणं महत्त्वाचं होतं. पीच आज मदत करत नव्हतं, त्यामुळे गुड लेन्थ आणि मिक्स व्हेरिएशन हा एकमेव पर्याय होता. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि विकेट मिळवता तेव्हा चांगलं वाटतं, ते संघासाठी आणि तुमच्या आत्मविश्वासासाठी चांगलंच आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला आहे.