कोलकाता : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वन-डे मॅच गुरुवारी खेळली जाणार आहे. मात्र, असे असतानाही बुधवारी टीम इंडियाने प्रॅक्टीस केली नाही आणि त्याचं कारणंही तसचं आहे.
सध्या सुरु असलेल्या पावसाचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला प्रॅक्टीस करता आलेली नाहीये. त्यामुळे आता दुसरी वन-डे मॅचही कमी ओव्हर्सची खेळवली जाण्याची शक्यता आहे.
बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने पीचचं निरीक्षण केलं आहे. गांगुलीने म्हटलं की, परिस्थिती चांगली दिसत आहे. हवामान खात्यानेही सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.
While #TeamIndia could not train at the Eden Gardens due to rain, the boys had a fun footy session ahead of the 2nd @Paytm ODI #INDvAUS pic.twitter.com/MMFhyiVEay
— BCCI (@BCCI) September 20, 2017
सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी पाऊस पडत असल्याने ऑस्ट्रेलियन टीमला इंडोर प्रॅक्टीस करावी लागली. दुपारच्या सुमारास टीम इंडिया प्रॅक्टीस करण्यासाठी मैदानात उतरली. मात्र, हलकासा पाऊस आणि धुक असल्याने प्रॅक्टीस करता आली नाही. पाऊस पडत असल्याने टीम इंडियाने ड्रेसिंग रुम लॉनमध्ये वॉलिबॉल खेळला.