हार्दीक पांड्या लवकरच करणार का हे २ विक्रम!

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये निपुण असलेला भारतीय खेळाडू हार्दीक  पांड्या आता नवा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये  आहे. 

Updated: Sep 20, 2017, 08:38 PM IST
हार्दीक पांड्या लवकरच करणार का हे २ विक्रम! title=

मुंबई  : फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये निपुण असलेला भारतीय खेळाडू हार्दीक  पांड्या आता नवा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये  आहे. 
आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये वेगवान धावा करण्याच्या यादीमध्ये हार्दीक दुसर्‍या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकत्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा खेळ उत्त्म राहिल्यास लवकरच तो अग्रस्थानी येण्याची शक्यता आहे. 
सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजचा आंन्द्रे रसेलने १३०.८५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानं वेस्ट इंडिजकडून ४१ सामन्यांतील ४३ डावांत २९.२७ च्या सरासरीनं ९८५ धावा केल्या आहेत. यात त्यानं ५३ षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद ५० षटकार मारण्याचा विक्रम देखील हार्दिक पांड्याला खुणावत आहे. पांड्याने १३ डावात आतापर्यंत २१ षटकार मारले आहेत. न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने ३३ सामन्यांत षटकारांचे अर्धशतक साजरं केले आहे.  हार्दिक पांड्याच्या खेळात उत्तम सातत्य राहिल्यास लवकरच तो हा विक्रम मोडीत काढू शकतो.  २०१६ मध्ये ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्याविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याचे पदार्पण झाले.