हैदराबाद : तीन टी20 मालिकेतील तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस़्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 186 धावा केल्या आहेत. कॅमेरॉन ग्रीन आणि टीम डेविडच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस़्ट्रेलिया ही धावसंख्या उभारली आहे.यामुळे आता टीम इंडियासमोर 187 धावांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया 9 वर्षांनंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकणार का याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला उतरली होती. ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात चांगली झाली नाही. फिंच 7, स्मिथ 9, मॅक्सवेल 6, जोश 24,वाडे 1, डेनियल 22 धावा करून बाद झाले. तर कॅमेरॉन ग्रीन 52 आणि टीम डेविड 54 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. या धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 186 धावा केल्या आहेत. टीम इंडियासमोर आता 187 धावांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान पुर्ण करून टीम इंडियाला मालिका खिशात घालता येणार आहे.
तीन टी20 मालिकेत पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसरा T20 यजमान टीम इंडियाने जिंकला होता. या विजयाने दोघेही 1-1ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका कोण खिशात घालतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मालिका विजयाची संधी
टीम इंडियाने शेवटची टी20 मालिका 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जिंकली होती. जर आज रोहित ब्रिगेडने कांगारूंना हरवले तर 9 वर्षांनंतर मायदेशात ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकतील.