IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे. 

Updated: Feb 14, 2023, 08:18 PM IST
IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत  title=

IND vs AUS 2nd Test: टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्धची नागपूर टेस्ट एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता क्रिकेट फॅन्सला 17 फेब्रुवारी पासून सूरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्याची उत्सुकता लागली आहे. मात्र या सामन्यापुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे हा खेळाडू दुसऱ्या टेस्ट सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे.

 

हे ही वाचा : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती 

 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत तो खेळणार नाही आहे. त्यात आता टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. दुसऱ्या टेस्टपुर्वी त्याची दुखापत टीम इंडियाला डोकेदुखी ठरू शकणार आहे.

कोण आहे हा खेळाडू? 

टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाला आहे. अय्यर अजूनही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे तो अद्याप फिट नाही आहे. संघ व्यवस्थापन त्याला मैदानात उतरवण्याचा धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पाठिच्या दुखापतीमुळे आधीच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला होता, आता दुसऱ्या कसोटीला देखील तो मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसणार आहेय  

 

हे ही वाचा : शुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ 

 

कसोटी खेळता येणार नाही? 

अय्यरने बंगळुरूमधील एनसीएमध्ये 'पुनर्वसन' कार्यक्रमाचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते. या व्हिडिओत तो प्रशिक्षक एस रजनीकांत यांच्यासोबत होता. आता या दुखापतीतून फिट झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय संघासह आंतरराष्ट्रीय पुनरागमन निकषांचा भाग म्हणून किमान एक देशांतर्गत सामना खेळण्याची आवश्यकता असणार आहे. कारण अय्यरला (Shreyas Iyer) कसोटी सामन्यात थेट मैदानात उतरवता येणार नाही.  मैदानात त्याला 90 ओव्हर क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि त्याला बराच वेळ फलंदाजी करावी लागणार आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती 1 ते 5 मार्च दरम्यान मध्य प्रदेश विरुद्ध इराणी चषक सामन्यात फिटनेस सिद्ध करण्यासाठी अय्यरचा उर्वरित भारतीय संघात समावेश करते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुसरा कसोटी सामना खेळणे अवघड मानले जात आहे. मात्र त्याला तिसऱ्या टेस्ट सामन्यात थेट एन्ट्री मिळते की, देशांतर्गत सामना खेळावा लागतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.