IND vs AUS 2ND T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी

ind vs aus 2nd t20i : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं.   

Updated: Sep 24, 2022, 12:27 AM IST
IND vs AUS 2ND T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी title=

नागपूर : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर (IND vs AUS 2ND T20) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 8 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 46 धावांची नाबाद खेळी केली. तर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शेवटच्या 2 बॉलवर सिक्स आणि फोर मारत भारताला विजय मिळवून दिला.  (ind vs aus 2nd t20i team india win 6 wickets against australia in do ior die match at vca nagpur dinesh karthik give finishing touch)

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 8 ओव्हर्स खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 8 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 90 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तर कॅप्टन एरॉन फिंचने 31 रन्स जोडल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने एक विकेट घेतली.

मालिका बरोबरीत 

दरम्यान या विजयासह टीम इंडयाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 25 सप्टेंबरला हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. 

 प्लेइंग इलेव्हन :

ऑस्ट्रेलिया : एरोन फिंच (कॅप्टन), कॅमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, टीम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, डेनियल सॅम्स, एडम झॅम्पा आणि जोश हेझलवुड.

टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.