IND vs AUS 2nd T20 : नागपूरच्या स्टेडिअमवर कोणत्या संघाचा दबदबा, रेकॉर्ड काय सांगतो?

टीम इंडिया कि ऑस्ट्रेलिया? नागपूरच्या स्टे़डिअमवर कोण कोणावर भारी पडणार? जाणून घ्या 

Updated: Sep 22, 2022, 10:59 PM IST
IND vs AUS 2nd T20 : नागपूरच्या स्टेडिअमवर कोणत्या संघाचा दबदबा, रेकॉर्ड काय सांगतो?  title=

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तत्पुर्वी नागपूरच्या स्टेडिअमवर कोणत्या संघाचा आतापर्यंत दबदबा राहिला आहे. या संदर्भातले आकडे काय सांगतात, ते जाणून घेऊयात.  

नागपुरातील सामना जिंकून टीम इंडियाला (Team india) मालिकेत पुनरागमन करायचे आहे. त्यामुळे टीम इंडिया हे पुनरागमन करते का हे उद्याच्या सामन्यानंतरच कळणार आहे. तत्पुर्वी नागपुरातील टीम इंडियाचा (Team india) विक्रम बघितला तर, मागील दोन टी-20 सामने येथे जिंकले आहेत.

 

दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट? सामना रद्द होण्याची शक्यता

 

रेकॉर्ड काय सांगतो?
टीम इंडियाने (Team india) 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-20 सामना नागपुरात खेळला होता. भारताने तो 30 धावांनी जिंकला. तर जानेवारी 2017 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळलेला सामना 5 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाने (Team india) नागपुरात एकूण 4 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2 सामने जिंकले आणि 2 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. या मैदानावर त्यांना श्रीलंका आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.

टीम इंडिया (Team india) टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्यांना 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 208 धावा केल्या होत्या. असे असूनही तो सामना वाचवू शकला नाही. दरम्यान आता नागपुरात विजयाची नोंद करून टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आता हे उद्याच्या सामन्यात शक्य होते का ते पाहावे लागणार आहे.