टीम इंडियाचा शेवटच्या सामन्यात मोठा विजय, पण आशिया कप 2022 मधून बाहेर

भारताने अफगाणिस्तावर विजय मिळवला आहे. पण आता त्याचा फारसा फरक पडणार नाही. कारण टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर झाली आहे.

Updated: Sep 8, 2022, 10:53 PM IST
टीम इंडियाचा शेवटच्या सामन्यात मोठा विजय, पण आशिया कप 2022 मधून बाहेर title=

Ind vs AFG, Asia Cup 2022 : टीम इंडियाने आशिया कप 2022 मधला शेवटचा सामना जिंकला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध भारताने 101 रनने विजय मिळवला. पण हे दोन्ही संघ 2022 च्या आशिया कपमधून बाहेर पडले आहेत. दोन्ही सुपर-4 संघ आपल्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. 

टीम इंडियाला सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.

टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानचा संघ 8 गडी गमावून केवळ 111 धावाच करू शकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 122 धावा केल्या.

विराट कोहलीच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमारचा कहर गोलंदाजीत पाहायला मिळाला. भुवनेश्वर कुमारने आपल्या 4 षटकात फक्त 4 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत.