...जर असे घडले तर भारत बांगलादेशला न हरवता फायनलमध्ये पोहोचेल

भारतीय संघाने द.आफ्रिकेला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आता भारताचा पुढील मुकाबला १५ जूनला बांगलादेशशी होईल. 

Updated: Jun 13, 2017, 04:12 PM IST
...जर असे घडले तर भारत बांगलादेशला न हरवता फायनलमध्ये पोहोचेल title=

लंडन : भारतीय संघाने द.आफ्रिकेला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आता भारताचा पुढील मुकाबला १५ जूनला बांगलादेशशी होईल. 

ग्रुप बीमध्ये दोन सामने जिंकत भारत चार गुणांसह अव्वल स्थानी आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून श्रीलंकेला पराभवाची चव चाखायला लागल्याने पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचलाय.

तर ग्रुप ए मध्ये बांगलादेशने न्यूझीलंडवर विजय मिळवत सेमीफायनल गाठली. तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडली. ग्रुप एमध्ये सहा गुणांसह इंग्लंड अव्वल स्थानी आहे तर तीन गुणांसह बांगलादेश दुसऱ्या स्थानी आहे. 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय राहिल्यास त्याचा फायदा भारताला होणार आहे. पावसामुळे हा सामना जर रद्द झाला तर भारत आणि बांगलादेश दोन्ही संघाना एक एक गुण दिला जाईल. त्यातच भारताचे गुण अधिक असल्याने गुणांच्या जोरावर भारत फायनलमध्ये पोहोचेल. हा सामना बर्मिंगहममध्ये खेळवला जाणार आहे.