मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ आहे. या सामन्याआधी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सीरिज सुरू आहे. पहिला सामना ड्रॉ झाला असून दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपआधी न्यूझीलंड संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. स्पिनर आणि केन विल्यमसन जखमी झाला आहे. दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध सीरिजमधून या दोघांनी ब्रेक घेतला आहे.
न्यूझीलंड संघाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 6 मोठे बदल केले आहेत. त्यांना वेगळी रणनिती आखली आणि ती यशस्वी होताना दिसत असल्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड गुरुवारपासून बर्मिंगहॅममध्ये दुसरा कसोटी सामना सुरू झाला. या सामन्यात न्यूझीलंडने टॉम ब्लंडेल, ट्रेंट बाउल्ट, विल यंग, डॅरेल मिशेल, मॅट हेन्री आणि अजाज पटेल यांना संधी दिली आहे. या खेळाडूंनी पहिला कसोटी सामना खेळला नव्हता. पाठदुखीने पीडित असलेल्या बीजे वॉटलिंगच्या जागी टॉम ब्लंडेलचा समावेश करण्यात आला आहे. जखमी केन विल्यमसनच्या जागी विल यंग खेळताना दिसणार आहे.
पहिल्या दिवस अखेर इंग्लंड संघाने 7 गडी गमावून 258 धावा केल्या आहेत. ट्रेंट बोल्डला दोन विकेट घेण्यात यश आलं. हेनरिने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. न्यूझीलंडने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं. 18 ते 22 जूनला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं देखील सावट आहे. 19 आणि 20 जूनला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.