Sara Tendulkar in Pune Match : आयसीसी विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चौथा सामना खेळली. पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर (MCA Stadium) भारत-बांगलादेश (India vs Bangladesh) सामना रंगला होता, या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रेटिंनीही हजेरी लावली होती. यात सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) उपस्थित होती. साराने स्टेडिअममध्ये बसून टीम इंडिया चिअर केलं. पण यावेळी सारा तेंडुलकरच्या बाजूला एक तरुण बसला होता. आता हा तरुण कोण असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत.
तो मिस्ट्री मॅन कोण?
सामना सुरु होताना कॅमेरा अचानक सारा तेंडुलकरवर गेला. यावेळी सारा टीम इंडियाला चिअर करताना दिसली. सारा तेंडुलकरच्या बाजूला एक तरुण बसला होता, हा तरुण कोण? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युजर्सने अनेक कमेंट केल्या आहेत. एका युजरने हा जुगनू असल्याचं म्हटलंय, तर एका युजरसने तो शुभमन गिलचा बेस्ट फ्रेंड केपी औलख असल्याचं म्हटलं आहे.
गिलला चिअर करताना दिसली सारा
भारताची गोलंदाजी सुरु असताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने तौहिदचा झेल टिपला. यावेळी साराने टाळ्या वाजवून सेलिब्रेट केलं. साराची ही झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सारा तेंडुलकरचं नाव शुभमन गिलशी जोडलं जातं. पण ही केवळ अफवा आहे, सारा किंवा शुभमनकडून याबाबत कोणतंह वक्तव्य करण्यात आलेलं नाही. दरम्यान, सारा तेंडुलकर अनेक वेळा टीम इंडियाचे सामने पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये हजर असते. आधीही अनेक सामन्यात तिला स्टेडिअममध्ये पाहिलं गेलं आहे.
भारतीय गोलंदाजाींची कमाल
पुण्यातल्या एससीएम स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. बांगलादेशने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन या सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी नजमुल हसन शांतोने कर्णधारपद सांभाळलं. बांगलादेशने डावाची दमदार सुरुवात केली. लिट्टन दास आणि तांझिद हसन या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी केली. पण कुलदीप यादवने तांझिद हसनला बाद केलं आणि टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. बांगलादेशने आठ विकेट गमावत 256 धावा केल्या.