हार्दिक पांड्याच्या जागी 'या' तीन खेळाडूंचा विचार, पण प्रसिद्ध कृष्णालाच संधी का? जाणून घ्या कारण

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णाची लॉटरी लागली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 4, 2023, 02:12 PM IST
 हार्दिक पांड्याच्या जागी 'या' तीन खेळाडूंचा विचार, पण प्रसिद्ध कृष्णालाच संधी का? जाणून घ्या कारण title=

ICC Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सलग सात सामने जिंकत सेमीफानयलमध्य (World Cup Semifinal) प्रवेश केला आहे. 2 नोव्हेंबरला झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबरोबरच टीम इंडियाने पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेत सेमीफायनलमधलं आपलं स्थानही निश्चित केलं आहे. पण टीम इंडियाला सेमीफायनलपूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya Ruled Out) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. 

दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला गेल्या तीन सामन्यांना मुकावं लागलं होतं. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी हार्दिक कमीतकमी तीन सामने खेळू शकणार नाही असं बीसीसीआय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे सेमीफायनलपूर्वी म्हणजे लीगमधल्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता हार्दिक पांड्या संपूर्णमधूनच बाहेर पडला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) संधी देण्यात आली आहे. 

प्रसिद्ध कृष्णालाच संधी का?
टीम इंडियात हार्दिक पांड्याच्या जागी मोठ्या स्पर्धांचा अनुभव नसलेल्या प्रसिद्ध कृष्णालाच का संधी देण्यात आली असा प्रश्न आता विचारला जात आहे. पण यामागे महत्त्वाचं कारण आहे. हार्दिक पांड्यच्या जागी बीसीसीआयसमोर तीन खेळाडूंचा पर्याय होता. यात संज सॅममन, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा या तीन खेळाडांचा यात समावेश होता. संजू सॅमसन विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज आहे. तिलक वर्मा फिरकी गोलंदाज आणि मधल्या फळीत डावखुला आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तर प्रसिद्ध कृष्णा वेगवान गोलंदाज आहे. 

हार्दिक पांड्या ऑलराऊंडर आहे. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन हे योग्य पर्याय आहेत. याशिवाय संघात ईशान किशन हा डावखुरा फलंदाज आहे. याशिवाय विकेटकिपर म्हणूनही ईशान किशनचा पर्याय आहे. त्यामुळे संजू सॅमसन आणि तिलक वर्माची संघा गरज नाही. त्यातच सध्या टीम इंडियात वेगवान गोलंदाजांची चलती आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे बारताचं वेगवान त्रिकुट जबरदस्त फॉर्मात आहे. या तिघांपैकी एकाला दुखापत झाल्यास त्यांना पर्याय म्हणून प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. 

प्रसिद्ध कृष्णाचा पंधरा खेळाडूंच्या स्कॉडमध्ये समावेश करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी दमदार कामगिरी करतायत.