गिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत

Shubman Gill Dengue: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  

राजीव कासले | Updated: Oct 6, 2023, 03:23 PM IST
गिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत title=

World Cup 2023 Team India: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) होणार असून अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल. पण पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूमुळे गिल सरावालाही मैदानात उतरला नाही. त्यामुळे विश्वचषकातला पहिला सामना गिल खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. 

सलामीला कोण?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामनयात शुभंमन गिल खेळू शकला नाही तर रोहित शर्माबरोबर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कोण करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे केल राहुल आणि दुसरा पर्याय आहे ईशान किशन. केएल राहुलकडे मोठे सामने खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तर त्या तुलनेत ईशान किशनकडे अनुभवी कमी आहे. त्यामुळे अनुभवाच्या आधारे केएल राहुल रोहित शर्माबरोर डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. 

केएल राहुलने एकदिवसीय सामन्यात सलामीला येत 3 शतकं आणि 6 अर्धशतकं केली आहेत. सोळा सामन्यात केएल राहुलच्या नावावर 669 जमा आहेत. तर सलामीला फलंदाजी करताना त्याची सर्वोत्कृष धावसंख्या आहे 111. तर दुसऱ्य क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 246 धावा केल्या आहेत. ईशानने भारतासाठी आतापर्यंत 5 एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सलामीला फलंदाजी केली आहे. यात त्याने 210 धावा केल्या आहेत. पाच सामन्यात त्याने 3 अर्धशतकं ठोकली आहेत. दोन सामन्यात त्याने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यात त्याने एक शतक केलं आहे. त्यामुळे आकडेवारी पाहिली तर केएल राहुलला सलामीला पहिली पसंती दिली जाऊ शकते. 

गिलसाठी दमदार वर्ष
शुभमन गिल पहिल्या सामन्यात बाहेर पडल्यास हा टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. कारण शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. हे वर्ष त्याच्यासाठी जबरदस्त ठरलंय. शुभमन गिलने केवळ 20 एकदिवसीय सामन्यात 1230 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट 105.03 इतका आहे. आपल्या खेळीत गिलच्या नावावर तब्बल 5 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. एका वर्षात पाच शतकं करण्याचा विक्रम गिलच्या नावावर जमा झाला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या एशिया कप स्पर्धेत शुभिन गिलने 302 धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल होता. एक वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी गिल 665 धावांनी दूर आहे. सचिनने एका कॅलेंडर वर्षात 1,894 धावा केल्या होत्या. 

भारतीय संघाचं वेळापत्रक

8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई 
11 ऑक्टोबर   vs अफगाणिस्तान  दिल्ली
14 ऑक्टोबर  vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर  vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर  vs न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर vs नेदरलँड्स , बंगळुरु