T20 World Cup 2021 : 'या' दिवशी भारत- पाक येणार आमने-सामने... कोणाची मॅच कोणत्या दिवशी? माहित करुन घ्या

 ICCने टी 20 वर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Updated: Aug 17, 2021, 12:55 PM IST
T20 World Cup 2021 : 'या' दिवशी भारत- पाक येणार आमने-सामने... कोणाची मॅच कोणत्या दिवशी? माहित करुन घ्या title=

मुंबई : ICCने टी 20 वर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 2021 मॅच 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत आणि त्याचा अंतिम सामना म्हणजेच फायनल 14 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. टी -20 वर्ल्ड कपचे सामने यूएई, ओमान, अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे होणार आहेत. 8 देशांचे क्वालीफाइंग मॅच 23 सप्टेंबरपासून सुरू होतील.

टी 20 वर्ल्ड कप 2021 चे ग्रुप खालीलप्रमाणे आहेत.

राउंड-1:

ग्रुप A: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबिया
ग्रुप B: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गुएना (पीएनजी) आणि ओमान

सुपर -12:

ग्रुप A: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, A 1 आणि B 2
ग्रुप B: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, A 2 आणि B 1.

क्वालीफाइंग मॅचच्या सामन्यात श्रीलंका, बांगलादेश आणि आयर्लंड सहभागी होणार आहेत. यावेळी सुपर 12 संघांना 2 गटांमध्ये विभागले गेले आहे. सुपर -12 सामन्यांपूर्वी क्वालीफाइंग मॅच खेळले जातील.

भारताचा ग्रुप 2 मध्ये समावेश

ग्रुप 2 मध्ये भारताचा समावेश आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याने गट 2 ची सुरुवात होईल. 26 ऑक्टोबर रोजी शारजाहमध्ये पाकिस्तानचा पुन्हा न्यूझीलंडशी सामना होईल. ग्रुप सामने 8 नोव्हेंबर रोजी संपतील. ज्यामधील A ग्रुपमधील दुसऱ्या नंबरवरील राउंड 1 टीमसोबत भारत क्वालिफायर संघाशी सामना करेल.

सेमी फायनल मॅच

पहिली सेमी फायनल मॅच 10 नोव्हेंबर रोजी अबु धाबी येथे होणार आहे. दुसरी सेमी फायनल मॅच 11 नोव्हेंबरला दुबईत खेळली जाईल. दोन्ही सेमी फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत.

फायनल मॅच 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल

खेळातील फायनल मॅच 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळली जाईल. फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.