ICC ने निवडला सर्वोत्तम T20 संघ, किती भारतीय खेळाडूंचा समावेश?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी अजूनही महागात  

Updated: Jan 19, 2022, 07:35 PM IST
ICC ने निवडला सर्वोत्तम T20 संघ, किती भारतीय खेळाडूंचा समावेश? title=

T20 Tem Of The Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) 2021 साठीचा सर्वोत्तम T20 संघ जाहीर केला आहे (ICC Men's T20I Team of the Year). या संघात जगभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण भारतीय क्रिेकेट चाहत्यांसाठी मात्र निराशा झाली आहे. 

एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
आयसीसीने निवडलेल्या सर्वोत्तम T20 संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूचा (Team India) समावेश करण्यात आलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानच्या (Pakistan) 3 खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंचं वर्चस्व
T20 विश्वचषक 2021 मध्ये चमकदार कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणारे पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी (Shaheen Shah Afridi) ICC T20 Playing 11 मध्ये स्थान मिळालं आहे. तर संघाचं कर्णधारपदही पाकिस्तानच्या बाबर आझमकडे (Babar Azam) सोपवण्यात आलं आहे.

IND vs PAK सामन्याचा प्रभाव
ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये (ICC T20 World Cup 2021), पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला, ज्याचा फायदा पाकिस्तानी क्रिकेटपटूंना होताना दिसत आहे. या हायव्होल्टेज सामन्यात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी चमकदार कामगिरी केली होती.

चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचाही समावेश
ऑस्ट्रेलियाच्या टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) यांचाही संघात समावेश आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम (Aiden Markram), डेव्हिड मिलर (David Miller) आणि तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) यांनाही संघात स्थान मिळाल आहे. 

ICC सर्वोत्तम T20 संघ
जोस बटलर, मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), अॅडन मार्कराम, मिशेल मार्श, डेविड मिलर, तबरेज शम्सी, जोश हेजलवुड, वानिंदु हसारंगा, मुस्तफिजुर रहमान आणि शाहीन शाह आफरीदी