ICC T20 Rankings : आपल्या तुफानी बँटिंगच्या जोरावर सध्या क्रिकेट जगताला वेड लावणाऱ्या सूर्याकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी-20 मधील आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार (ICC T20 Rankings) सूर्याकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे स्टार खेळाडू विराट कोहलीची खालच्या स्थानी घसरण झाली आहे. (ICC T20 Rankings Suryakumar Yadav)
सूर्याकुमार यादव 890 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहलीची दोन स्थानांनी घसरण झाली असून 650 गुणांसह तो आता 13 स्थानावर गेला आहे. सूर्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान 836 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडचा डेव्हिड कॉनवे 788 गुणांसह तिसऱ्या, बाबर आझम एका स्थानाने घसरला असून 778 गुणांसह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम 748 गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे.
सूर्याने आताच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 239 धावा केल्या होत्या. सूर्याने यंदाच्या कॅलेंडर वर्षामध्ये दोन शतके झळकवली आहेत. आताच न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये सूर्याने 111 नाबाद धावा करत तुफानी शतक ठोकलं होतं. त्याआधी त्याने इंग्लंडविरूद्ध पहिलं शतक केलं होतं. तिसऱ्या टी-20 मध्ये सूर्या 13 धावा करून बाद झाला त्यामुळे त्यांचं 5 गुणांनी नुकसान झालं. परंतु याचा त्याला काही फटका बसला नसून तो पहिल्या स्थानावर कायम आहे.
टॉप -10 फलंदाज टी-20 क्रिकेट
दरम्यान, टॉप 10 मध्ये सूर्यकुमार यादव, मोहम्म रिझवान, डेव्हिड कॉनवे, बाबर आझम, एडन मार्करम, डेव्हिड मलान, ग्लेन फिलिप्स, रूसो, अॅरोन फिंच आणि पाथुमा निसांका हे खेळाडू आहेत.