नवी दिल्ली: यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिन्ही मेडल मिळवण्यात यश आलं आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सामावेश करण्याबाबत सध्या विचार सुरू असतानाच एक क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी येत आहे. ऑलिम्पिकमध्ये देखील क्रिकेटचा सामावेश केला जाण्याची शक्यता आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये टीम इंडिया क्रिकेट खेळण्यासाठी उतरण्याची शक्यता आहे.
आयसीसीने मंगळवारी यासंदर्भात एक ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं की, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा आहे. आयसीसीने एक काम करणारा गट बोलावला आहे जो लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 आणि ब्रिस्बेन ऑलिम्पिक 2032 आणि त्यावरील खेळासाठी निविदा सादर करेल.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, 'आयसीसीच्या वतीने, मी IOC, टोकियो 2020 आणि जपानच्या लोकांचे अभिनंदन करू इच्छितो. भविष्यात क्रिकेट जर ऑलिम्पिकचा एक भाग बनला तर याचा आम्हाला आनंदच होईल असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. बार्कले पुढे म्हणतात की, "आम्ही ऑलिम्पिकला क्रिकेटचे दीर्घकालीन भविष्य म्हणून पाहतो,
ICC can confirm its intention to push for cricket's inclusion in the @Olympics, with the 2028 Games in Los Angeles being the primary target.
More details
— ICC (@ICC) August 10, 2021
'जगभरात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत, त्यातील 90 टक्के लोक ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहतात." हे स्पष्ट आहे की क्रिकेटला सक्तीचे आणि उत्कट चाहते आहेत. विशेषत: दक्षिण आशियाई देशांमध्ये जिथे आमचे 92 टक्के चाहते येतात. बार्कले म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला तर ती एकंदरच फायद्याची बाब ठरू शकते. मला माहीत आहे की क्रिकेटचा सामावेश करणं तितकं सोपं नाही.'
यावर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय खेळाडूंनी एकूण 7 पदके जिंकली. भारतासाठी नीरज चोप्राने सुवर्ण, मीराबाई चानू आणि रवी दहिया यांनी रौप्य, तर पीव्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदके पटकावली. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा लॉस एंजलिसला मिळाला आहे. त्यानुसार ही स्पर्धा तिथे खेळवण्यात येणार आहे.
जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर भविष्यात भारताला अधिक पदके मिळू शकतात. 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा एकून 2 संघानी सहभाग घेतला होता.