कार्डिफ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात लढत होतेय. दोन्ही संघांची या सामन्यात आज करो वा मरो अशी स्थिती आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक आहे. मात्र सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघाना केवळ विजय मिळवून भागणार नाहीये. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियाचा पराजय झाल्यास न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यातील विजेता संघाला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.
त्यामुळे या सामन्यातील विजय तसेच इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांवर न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघाचे भवितव्य अवलंबून आहे.