मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. ड्युक बॉलनं हा सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. आयसीसीने देखील या अंतिम सामन्यासाठी कॉमेंट्री कोण करणार याची यादी एका व्हिडीओमधून जाहीर केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी भारताकडून एका विकेटकीपरला संधी मिळाली आहे.
लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासोबत अनेक दिग्गज कॉमेंट्री करणार आहेत. या सर्वांसोबत यावेळी विकेटकीपर आणि स्टार फलंदाज दिनेश कार्तिकला देखील कॉमेन्ट्री करण्याची संधी मिळाली आहे. आयसीसीने व्हिडीओ शेअर करून यासंदर्भात माहिती दिली आहे. एकूण 9 सदस्यांचं पॅनल असणार आहे.
The voices that will bring the #WTC21 Final to you
Sound ON! pic.twitter.com/BjFJZyjWis
— ICC (@ICC) June 16, 2021
सुनील गावस्कर यांच्यासोबत विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक, श्रीलंकाचा माजी कर्णधार कुमार संगकारा, इंग्लंचा माजी कर्णधार नासिर हुसैन देखील कॉमेंट्री करताना दिसणार आहे. या सगळ्य़ांमध्ये एकमेव महिला इशा गुहा देखील आहे. इयान बिशप, माइकल आर्थटन, क्रेग मॅक मिलन देखील कॉमेन्ट्री करताना दिसणार आहे.