Ibrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'

AUS vs AFG  World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.

सौरभ तळेकर | Updated: Nov 7, 2023, 08:05 PM IST
Ibrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...' title=
Ibrahim Zadran

Australia vs Afghanistan : फक्त 21 वर्षांच्या इब्राहीम झद्रानचं (Ibrahim Zadran) शतक आणि करामती राशिद खान (Rashid Khan) याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं अवघड असं आव्हान दिलंय. इब्राहीम झद्रान याने या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. 143 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने इब्राहिमने इतिहास रचला (first Afghanistan player score hundred in World Cup) आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर इब्राहिमने सचिन तेंडूलकरचे आभार मानले आहेत. 

काय म्हणाला Ibrahim Zadran ?

मी सचिन सरांशी छान गप्पा मारल्या, त्यामुळे मला मदत झाली, त्यांनी 24 वर्षे क्रिकेट खेळलंय.  सचिन सरांचेआभार, त्यांच्याकडून खूप आत्मविश्वास मिळाला. विश्वचषकात 100 धावा करणारा पहिला अफगाण खेळाडू बनून खूप आनंद होत आहे. मला आणखी अनेक शतके झळकावायची आहेत. या स्पर्धेसाठी मी खूप मेहनत घेतली. पाकिस्तानविरुद्ध, माझं शतक हुकले, त्यामुळे मला या सामन्यात ते पूर्ण करायचे होते. पुढच्या 3 सामन्यात मी शतक झळकावणार असं वाटत होतं, अशी भावना इब्राहिमने व्यक्त केली आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाने आता पाकिस्तानत्या संघाला चांगलीच धडकी भरवली आहे. अफगाणिस्तानचा आजचा सामना जिंकला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरची भेट घेतली होती. संघातील खेळाडूंनी सचिनसोबत बराच वेळ घालवला आणि यादरम्यान क्रिकेटशी संबंधित अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर खेळाडूंचे फोटो शेअर केले होते.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.