नवी दिल्ली : वायुसेनेचे अध्यक्ष बी एस धनाओ यांनी नुकत्याच संपलेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी क्रिकेटर फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडे हिचा सत्कार केलाय.
मंगळवारी भारतीय महिला क्रिकेट टीमची सदस्य असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट शिखा पांडे हिचा एअर चीफ मार्शल धनोआ यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
CAS ACM BS Dhanoa felicitated F/L @shikhashauny #IndianWomenCricket team,appreciating her performance & wished success for future endeavors pic.twitter.com/26962RqcjO
— Indian Air Force (@IAF_MCC) August 1, 2017
भारतीय महिला टीम आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये यजमान इंग्लंडकडून ९ रन्सनं पराभूत झाली होती. परंतु, टीमच्या जिद्दी खेळीचं मात्र सगळ्यांनीच तोंड भरून कौतुक केलं होतं.
फ्लाईट लेफ्टनंट पांडेनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये तीन आणि इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये दोन विकेट घेतले होते. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तिनं १७ रन्सची खेळी करत दोन विकेटसही घेतले होते.
३० जून २०१२ रोजी एअर ट्राफिक नियंत्रण अधिकारी म्हमऊन शिखानं वायूदलात पदभार स्विकारला होता. भारतीय महिला क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करणारी शिखा ही वायूदलातील पहिला महिला अधिकारी ठरलीय.