मी RCB ला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. 

पुजा पवार | Updated: Sep 2, 2024, 07:05 PM IST
मी RCB ला पहिल्यांदा  IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा title=
(Photo Credit : Social Media)

Priyansh Arya : येत्या काही महिन्यात आयपीएल 2025 साठी ऑक्शन पार पडेल. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन संघ प्रत्येकी पाच वेळा चॅम्पियन बनले आहेत. तेव्हा काही दिवसांपूर्वीच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलवर 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने आपण आरसीबीला पहिल्यांदा चॅम्पियन बनवू शकू असं मोठं विधान केलं. 

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळू इच्छितो कारण..... 

फलंदाज प्रियांश आर्य याने म्हंटले की, "आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून मी खेळू इच्छितो, कारण विराट कोहली माझा आवडता क्रिकेटर आहे. आजतागायत आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने ट्रॉफी जिंकलेली नाही. तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्यासाठी मी माझं 100 टक्के देईल". 

हेही वाचा : Nitesh Kumar:सैन्यात जायची होती इच्छा पण ट्रेन अपघाताने बदललं आयुष्य, भारताच्या 'गोल्डन बॉय'चा संघर्षमय प्रवास

 

कोण आहे प्रियांश ऑर्य? 

23 वर्षीय फलंदाज प्रियांश आर्य याने भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह प्रमाणे एका ओव्हरमध्ये 6 सिक्स करण्याची कामगिरी केली आहे. 31 ऑगस्ट रोजी  दिल्ली प्रीमियर लीगच्या सामन्यात साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना प्रियांश आर्य याने 12 व्या ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर सिक्स ठोकले. साउथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नार्थ दिल्ली स्ट्राइकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात प्रियांशने दमदार फलंदाजी करून शतक सुद्धा लगावले.  प्रियांशने  120 तर आयुष बडोनीने 165 धावा केल्याने साऊथ दिल्ली टीमने 308 धावांचा मोठा स्कोअर बनवला. प्रियांशला ही ओव्हर  मनन भरद्वाजने फेकली होती. प्रियांशने या सामन्यात अवघ्या 40 बॉलमध्ये शतक पूर्ण केले. तर 50 बॉलमध्ये त्यांनी 120 धावांची कामगिरी केली, ज्यात 10 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. 

6 बॉलवर 6 सिक्स मारल्यावर काय म्हणाला प्रियांश? 

स्पोर्ट्स यारीसोबत बोलताना प्रियांश आर्य म्हणाला की, "मी 12 व्या ओव्हरला तीन सिक्स मारले मात्र जेव्हा चौथा सिक्स बसला तेव्हा मला वाटले की मी सहा सिक्स मारू शकतो. माझ्या सोबत आयुष बडोनी खेळत होता. आयुष मला म्हणाला, फार क्वचित एखाद्याला पहिल्या चार बॉलवर चार सिक्स मारण्याची वेळ येते, तेव्हा असंच खेळत राहा".