Rohit Sharma stump mic chat viral : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे सामन्यात भारत जिंकता जिंकता राहिला. हा सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियासमोर विजयासाठी 231 रन्सच लक्ष्य होतं. पण शेवटचा विकेसाठी एक रन हवा असताना विकेट गेली आणि हा सामना हातातून निसटला आणि तो बरोबर राहिला. पण या सामन्यादरम्यानचा कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो एका खेळाडूला सुनावताना दिसतोय. 'तुझ्यासाठी सगळं मीच करु ...' या शब्दात तो खेळाडूशी बोलताना दिसला. रोहितचा ही बातचीत स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालाय.
भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची आघाडीची फळी कोलमडली, पण सलामीवीर पथुम निसांका आणि ड्युनिथ वेललागे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान संघाने आठ बाद 230 धावसंख्या गाठली. या मॅचदरम्यान रोहित एका खेळाशी संवाद साधत असताना त्याचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये रेकार्ड झाला. झालं असं की, वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेचा फलंदाज ड्युनिथ वेल्लालाघेला गोलंदाजी करत असताना आणि वेल्लालाघेच्या पॅडला चेंडू लागल्याने एलबीडब्ल्यूचे आवाहन करतानाचा हा आवाज आहे. तेव्हा सुंदरने यष्टिरक्षक केएल राहुल आणि कर्णधार रोहितकडे पहिलं. त्याचा नजरेत प्रश्न होता की, स्लिपमध्ये उभ्या असलेल्यांना रिव्ह्यू घ्यायचा आहे का की नाही. राहुल लगेच म्हणाला की मला खात्री नाही. यावर रोहित पहिल्या स्लिपला 'काय? 'तू मला सांग. तू माझ्याकडे का बघतोय?' ''तुझ्यासाठी सगळं मीच करु का?'' असं त्याने विचारलं.
Rohit Sharma is one of the most entertaining character on field pic.twitter.com/eMvy4Xhimq
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) August 2, 2024
हे सगळं स्टंपच्या माईकमध्ये रेकार्ड झालं आणि आता ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन्सही कमेंट करून या व्हिडीओवरुन मजा घेत आहेत.
दरम्यान सामन्यानंतर रोहित म्हणाला की, 'स्कोअर गाठता आला असता. पण यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागते. आम्ही चांगली फलंदाजी केली पण लय राखता आला नाही. आम्ही चांगली सुरुवात केली. पण फिरकी आल्यावर खेळ बदलला हे आम्हाला माहीत होतं. आम्ही काही विकेट गमावल्या आणि मागे पडलो.' फारशी टीका न करता कर्णधार म्हणाला, 'अक्षर पटेल आणि केएल राहुल यांच्या भागीदारीने आम्ही पुनरागमन केलं. मात्र तो बाद झाल्याने पुन्हा संतुलन बिघडलं. 14 चेंडूत एकही धाव काढता न आल्याने निराश झालो, पण मी जास्त बोलणार नाही.'